Principal Message

निवेदन

प्रिय पालक व विद्यार्थी मित्रांनो,
सर्वप्रथम इयत्ता बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थांचे मी मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. तद्वतच बी.एस्सी. (होमसायन्स), बी.एस्सी. (मॅथेमॅटीक्स / बायोइन्फाँरमेटिक्स), बी.ए. (सोशल वर्क), बी. कॉम. (कॉम्प्युटर मँनेजमेंट) या सर्व शाखा मधील व गृहविज्ञान महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो. आज आपला देश विज्ञान, तंत्रज्ञान, वाणिज्य इत्यादि क्षेत्रांमध्ये झपाट्याने प्रगती करीत आहे. वाढत्या लोकसंख्येसोबत शिक्षणाची गरजही वाढत आहे. देशाची प्रगती व्हावयाची असेल तर पारंपारिक शिक्षणासोबत विज्ञान व तंत्रज्ञान व इतरही क्षेत्रांमध्ये रोजगारभिमुख अभ्यासक्रम शिकणे आवश्यक झाले आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थाना जश्या नव-नवीन अभ्यासक्रमांच्या संधी उपलब्ध असतात, तश्या प्रकारच्या संधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना उपलब्ध व्हाव्यात या एकमेव उद्देशाने श्री दत्त लखमाजी शिक्षण प्रसारक मंडळ, अमरावती या संस्थेने सन २००८ पासून चांदूर बाजार येथे विज्ञान व गृहविज्ञान महाविद्यालयाच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध केली आहे. सन २०१० पासून समाजकार्य व वाणिज्य शाखेने अद्यावत अभ्यासक्रम सुरु करून महाविद्यालयाने एक पाऊल पुढे टाकले आहे. सन २०१७-२०१८ पासून महाविद्यालय एका दशकाच्या प्रवासाकडे वाटचाल करणार आहे. त्या दृष्टीने दशकपूर्ती वर्षात विद्यार्थ्यांसाठी अनेक नवीन उपक्रम हाती घेण्याचा महाविद्यालयाचा संकल्प आहे. अर्थात या सर्व कार्यात चांदूर बाजार व लगतच्या परिसरातील नागरिक व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य अपेक्षित आहे व ते महाविद्यालयाला निश्चितच मिळेल असा आत्मविश्वास मला आहे. सर्व विद्यार्थ्यांचे मी स्वागत करतो व त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.

प्राचार्य डॉ. विनय कृष्णराव कडू
प्राचार्य